शिरगाव ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पाककला स्पर्धेचे आयोजन

दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी ग्रामपंचायत शिरगाव ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं.
या स्पर्धेमध्ये नाचणी पिकापासून पदार्थ बनवणे हा विषय ठेवण्यात आला होता. या स्पर्धेला शिरगावातील 19 महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता .या स्पर्धकांनी नाचणीपासून ढोकळा ,शिरा, हलवा ,नाचणी ,कतली, आंबील ,कडी ,मोदक, उत्तप्पा, डोनट, प्रोटीन पावडर ,थालीपीठ इत्यादी पदार्थ प्रदर्शनात ठेवले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन तालुक्याच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर ज्योती यादव व तालुका कृषी अधिकारी शाहू पवार यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर सावली पवार, मंडळ कृषी अधिकारी मनोज गांधी, शिरगाव सोसायटीचे चेअरमन जयंतराव शिंदे, शिरगाव गावच्या सरपंच श्रीमती नीता शिंदे, तसेच ग्रामपंचायत सदस्य व कृषी सहाय्यक – डीपी खारतोडे जे.के काते, संतोष जाधव, सचिन पवार, रेश्मा दडस, अश्विनी कणसे ,व शेतकरी महिला उपस्थित होत्या. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास पैठणी, द्वितीय क्रमांकास साडी ,तृतीय क्रमांकास साडी व सर्व स्पर्धकांना सहभाग घेतल्याबद्दल प्रमाणपत्र महिला दिनाच्या दिवशी देण्यात येणार आहे.
बक्षिसाचा भार प्रभात योग्यता विकास केंद्र ,लोटे खेड यांनी स्विकारला आहे .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →