कोळकेवाडी ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पाककला प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

दिनांक 2 मार्च 2023 रोजी कोळकेवाडी ग्रामपंचायत कार्यालय ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पाककला प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
या कार्यक्रमामध्ये मंडळ कृषि अधिकारी खेर्डी श्री मनोज गांधी यांनी विविध तृणधान्याचे आपल्या आहारातील महत्व व वरकस जमीनीवर नाचणी,वरी चे क्षेत्र वाढविण्यासाठी व PMFME योजनेचे मार्गदर्शन केले . तसेच भरडधान्याच्या पाककला प्रात्यक्षिक मालप मॅडम यांनी करून दाखविले . यावेळी सरपंच बोलाडे ,सदस्य राणे मॅडम ,पल्लवी शिंदे मॅडम ग्रामसेवक पिंगळे सर, कृष्णा कालबे खरेदी विक्री संघ संचालक व शेतकरी महिला उपस्थित होत्या. या
या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन कृषि सहाय्यिका अश्विनी कनसे यांनी केले होते .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →