धामणी ता.खेड जि.रत्नागिरी येथे क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रमात पौष्टिक तृणधाण्याचे महत्व याविषयी मार्गदर्शन

दिनांक 3/3/2023 रोजी तालुका कृषि अधिकारी कार्यालय खेड मार्फत आत्मा अंतर्गत मौजे धामणी ता.खेड जि.रत्नागिरी येथे प्रगतीशील शेतकरी श्री. प्रकाश महाडिक यांच्या बागेत क्षेत्रीय किसान गोष्टी हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मा.उपविभागीय कृषि अधिकारी दापोली श्री. कोळप साहेब, मा.तालुका कृषी अधिकारी खेड श्री. महाडिक साहेब, विद्यापीठ शास्त्रज्ञ डॉ. जगताप सर, मंडळ कृषी अधिकारी श्री. शिंदे साहेब, श्री. घाणेकर साहेब, धामणी सरपंच मा.शिंदे मॅडम, ग्रा पं सदस्य श्री. कासारे साहेब, शेतकरी सल्ला समितीचे अध्यक्ष श्री. गुरव साहेब व सर्व सदस्य, कृषि पर्यवेक्षक श्री. बिरनाळे साहेब, BTM श्रीम. मोहिते, कृषी सहाय्यक श्री. धांडे, श्री. जाधव, श्री. निकम, श्रीम. दिवाळे, श्रीम. कणसे, DRP श्री. निकम व बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.
डॉ. जगताप सर यांनी आंबा, काजू व नारळ पीक व्यवस्थापन बाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले, मा. कोळप साहेब यांनी बदलत्या हवामानामुळे फळ पिकांवर होणारे परिणाम व त्यावर घ्यायची काळजी तसेच pmfme योजने बाबत माहिती दिली, मा.महाडिक साहेब यांनी कृषी विभागाच्या विविध योजना व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य 2023 बाबत मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →