शिरगाव ता.चिपळूण जि रत्नागिरी येथे त क्षेत्रिय किसान गोष्टी कार्यक्रमामध्ये पौष्टिक तृणधान्याचे महत्व याबाबत मार्गदर्शन

दिनांक ४ मार्च 2023 रोजी शिरगाव ता.चिपळूण जि रत्नागिरी येथे विविध कार्यकारी सोसायटीचे हॉल मध्ये कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा ) अंतर्गत क्षेत्रिय किसान गोष्टी कार्यक्रम आयोजीत केला होता . या कार्यक्रमामध्ये शेतीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांचा प्रशस्तीपत्रक मा . तालुका कृषि अधिकारी , श्री . शाहू पवार व चेअरमन श्री . जयंत शिंदे यांचे हस्ते देवून सन्मान करण्यात आला .
सदरच्या कार्यक्रमात भाजीपाला , फळबाग , भातशेती , सेंद्रिय शेती करणारे विविध शेतकऱ्यांनी शेतीमधील आपले अनुभव कथन करून शेतीमध्ये कसे सक्सेस झालो हे जमलेल्या शेतकऱ्यांना सांगितले .
शेती विषयक तांत्रिक माहिती उपस्थित शेतकऱ्यांना श्री . माऊली जगताप, सहयोगी सहाय्यता ,कृषि संशोधन केंद्र , आवाशी यांनी मार्गदर्शन केले . तसेच श्री . शाहू पवार , तालुका कृषि अधिकारी यांनी कृषि विभागाच्या योजनांची माहिती दिली . सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ विषयी मार्गदर्शन मंडळ कृषि अधिकारी श्री .मनोज गांधी यांनी केले . या कार्यक्रमासाठी सोसायटीचे सर्व संचालक मंडळ , शिरगाव सरपंच श्रीम . नीता शिंदे , कुंभाली सरपंच श्री . सकपाळ , व शिरगाव गटातील विविध गावातील शेतकरी उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन कृषि सहाय्यक दादासो खारतोडे यांनी केले होते .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →