आत्मा अंतर्गत शेतीशाळा मध्ये पौष्टीक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम

आज दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी ग्रामपंचायत मोडगाव येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत अळंबी(mushroom) लागवड शेतीशाळा आणि आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्री अशोक महाले सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक डहाणू यांनी उपस्थित प्रमुख पाहुणे, प्रमुख मार्गदर्शक आणि प्रगतशील शेतकरी आणि महिला शेतकरी यांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात केली. श्री नामदेव वाडीले तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक डहाणू यांनी आत्मा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या शेतकरी गट, शेतीशाळा, अभ्यास दौरे ,गटामार्फत विक्री व्यवस्थापन करणे बाबत मार्गदर्शन केले .श्रीमती रूपाली देशमुख मॅडम,(गृह विज्ञान तज्ञ) कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आळंबी लागवड पूर्वतयारी बाबत पी .पी टी .द्वारे उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे पौष्टिक तृणधान्य नागली, वरई ,ज्वारी ,बाजरी राजगिरा हे पौष्टिक,सकस,आहार समतोल ठेवण्यासाठी आपल्या दैनंदिन आहारामध्ये किमान आठवड्यातुन किमान दोन दिवस वापर करावा असे सांगितले. श्री अनिल सांबर ,सरपंच ग्रामपंचायत मोडगाव, यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आळंबी लागवड करणे आणि इतर कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आणि उपस्थित कर्मचारी यांचे विशेष आभार मानले. श्रीमती रंजना भरभरे कृषी सहाय्यक आंबोली, यांनी कार्यक्रम आयोजित करण्यास विशेष मेहनत घेतली. प्रगतशील शेतकरी श्री. विलास चौधरी, शेतकरी आणि महिला शेतकरी उपस्थित होते. शेवटी उपस्थित शेतकऱ्याचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →