मौजे देवकुरळी ता. तुळजापूर येथे हुरडा दिन साजरा

मौजे देवकुरळी ता. तुळजापूर येथे आज दिनांक १७.०२.२०२३ हुरडा दिन साजरा करण्यात आला. श्री अनंत दाजी नवगिरे यांचे शेतामध्ये कृषि विभागामार्फत हुरडा दिनाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी प्रक्षेत्र भेट झाल्यानंतर मंडळ कृषि अधिकारी श्री ए. एन. जगदाळे यांनी उपस्थितांना पौष्टिक तृणधान्य बाबत माहिती दिली. कृषि सहाय्यक श्री अनिल पवार यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत माहिती दिली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →