Millet year 2023 : भरडधान्यांच्या या कुल्हडमध्ये चहा प्या आणि नंतर हे कुल्हड खाऊन टाका!

आपल्या देशात चहाप्रेमींची संख्या प्रचंड आहे. कुठेही गेलात तरी चहाच्या टपऱ्या जागोजागी दिसतील. रेल्वे स्थानकं, बसस्थानकं अशा ठिकाणी चहाचे अनेक स्टॉल असतात. उत्तर प्रदेशातील देवरिया येथील एका शेतकरी गटाने नाचणीच्या पीठापासून ‘कुल्हड’ तयार केले आहेत, जे खाताही येतात.

तिथं चहा देण्यासाठी मातीच्या पेल्यांचा म्हणजेच कुल्हडचा (Kulhad) वापर केला जातो. माती पासून बनवलेले कुल्हड अतिशय स्वस्त आणि पर्यावरणपूरक असल्यामुळे त्याचं आरोग्याच्या दृष्टीनंही महत्व आहे. 

तर असे हे कुल्हड आता चाहासोबत नाश्ता म्हणून खाता येणार आहेत. तर हे कसं शक्य आहे? तर, उत्तर प्रदेशातील देवरिया येथील एका शेतकरी गटाने नाचणीच्या पीठापासून (Ragi Floor) ‘कुल्हड’ तयार केले आहेत, जे खाताही येतात.

नाचणी हे धान्य पौष्टिक भरडधान्य (Millets) प्रकारात (मिलेट) येत असल्यामुळे नाचणीपासून बनवलेले हे कुल्हड अतिशय पौष्टिक आहेत.

त्यामुळे या कुल्हडमध्ये जो कुणी चहा पेईल त्याला हे ‘मीलेट कुल्हड’ (Millet Kulhad) खाऊन पौष्टिक न्याहारीचाही आस्वाद घेता येणार आहे. 

आपण जसं कोनमधे दिलं जाणार आईस्क्रिम कोनसह खाऊन टाकतो अगदी तसंच हे मिलेट कुल्हड चहा पिल्यानंतर खाता येणार आहेत.

दोन वर्षांपूर्वी भरडधान्याचे आरोग्यवर्धक फायदे लक्षात घेऊन देवरिया येथील शेतकरी गटाने नाचणीपासून खाता येतील असे कुल्हड बनवायला सुरुवात केली.

हे कुल्हड बनविण्यासाठी एक खास साचा तयार केला. या साच्याचा वापर करुन एकाच वेळी २४ कुल्हड बनवता येतात.

नाचणी आणि मक्याच्या पिठापासून बनवलेल्या या पौष्टिक कुल्हडांनी प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या माघ मेळ्यात चहाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे.

शेतकरी गटाचे सदस्य अंकित राय यांच्या म्हणण्यानुसार, पूर्व उत्तर प्रदेशातील ग्रामीण आणि शहरी भागात या कुल्हडांची मागणी झपाट्याने वाढत आहे. 

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →