डहाणू तालुक्यातील ज्वारी बाजरीची पीक प्रात्यक्षिके व मार्गदर्शन अस्वली गावात

डहाणू तालुक्यातील अस्वली गावामध्ये पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी अंतर्गत पीक प्रात्यक्षिके घेण्यात आलेली आहेत. या गावात एक हेक्टर क्षेत्रावर एक प्रात्यक्षिक घेण्यात आलेले आहे. पूर्वी काही शेतकरी फक्त बांधावर ज्वारी किंवा बाजरीची लागवड करीत असे. आज आपल्या आरोग्याच्या दृष्टीने त्याचे लागवड क्षेत्र वाढवणे आवश्यक आहे. यासाठी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. यावेळी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व कृषी पर्यवेक्षक डहाणू श्रीमती विशे मॅडम यांनी उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगितले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. अस्वली गावच्या आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी देखील या लागवडीची पाहणी केली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →