तालुका खेड जिल्हा रत्नागिरी येथे आयोजित कृषि प्रदर्शनात पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन

दिनांक 13/2/23 रोजी मौजे कुळवंडी तालुका खेड येथे एस के ऍग्रो फार्म व नवसंजीवनी ग्रामविकास संस्था,कुळवंडी यांचे मार्फत कृषि प्रदर्शन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. श्री. संजय सावंत, तालुका कृषि अधिकारी श्री. संजय महाडीक व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
मा. कुलगुरू श्री संजय सावंत यांनी फळप्रक्रिया, प्रक्रिया उद्योग या विषयांवर मार्गदर्शन केले. मा. तालुका कृषि अधिकारी श्री संजय महाडिक यांनी PMFME, पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व व कृषि विभागाच्या सर्व योजनानबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास कृषि अधिकारी श्री. शिंदे, बी टी एम श्रीमती मोहिते, कृषि पर्यवेक्षक श्री येसरे, श्री गोठल,कृषि सहाय्यक श्री पडघान, श्री  समाधान अचलखांब, श्रीमती. झेंडगे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →