डहाणू तालुक्यातील कासा गावात जि. प.सदस्य श्री.काशिनाथ चौधरी यांचे हस्ते श्रीफळ वाढवून चित्र रथ चे स्वागत

पालघर जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे अध्यक्ष श्री. काशिनाथ चौधरी साहेब यांनी कासा ग्रामपंचायत जवळ बिरसा मुंडा चौकामध्ये उपस्थित असलेल्या पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी चित्ररथासमोर श्रीफळ वाढवून स्वागत केले. तसेच उपस्थित शेतकरी बंधू भगिनी यांना पौष्टिक तृणधान्याबाबतचे महत्त्व समजावून सांगितले. ते स्वतः नाचणीचे आंबील रोज घेतात,याबद्दल सर्वांना अभिमानाने सांगितलं. स्वतः पासून या गोष्टीची सुरुवात सर्वांनी करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केलं. कृषी विभागाच्या या चित्ररथास या संकल्पनेस आणि कृषी विभागाच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यास या जनजागृती बद्दल शुभेच्छा दिल्या.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →