जत जि.सांगली

माळरान कृषी प्रदर्शन जत आणि आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे औचित्य साधून जत शहरातून रॅली काढण्यात आली. या भव्य रॅलीत जत तालुक्याचे आमदार मा. विक्रमसिंह( दादा) सावंत यांनी सहभाग घेतला आणि मार्गदर्शन केले. त्याचबरोबर उप विभागीय कृषी अधिकारी मा श्री मनोजकुमार वेताळ साहेब आणि तालुका कृषी अधिकारी मा मेडिदार साहेब यानीही या रॅलीचे महत्व सांगुन मार्गदर्शन केले. जत तालुक्यातील खत दुकानदार असोसिएशन चे सर्व पदाधिकारी आणि विक्रेते यांनी सहभाग नोंदवला. कृषी विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी रॅलीचे उत्तम नियोजन केले. या रॅलीचे खास वैशिष्ट्य म्हणजे जत शहरातील एस आर व्ही एम आणि ज्यु कॉलेज चे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रॅलीची शोभा वाढविली. या विद्यार्थ्यांना मा आमदार साहेब आणि इतर मान्यवरांच्या हस्ते बाजरी ज्वारी आणि नाचणी चे बिस्किटे वाटप करण्यात आले. ही बिस्किटे अग्रण धुळगांव (क. महंकाळ) येथील श्री हेमंत खंडागळे या शेतकऱ्यांनी तयार केलेली आहेत.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →