दिनांक ०६/०२/२०२३ रोजी मौजे डोनगाव येथे नेहरू युवा केंद्र,जळगाव मार्फत आयोजित शिबिरात तरुणांना मार्गदर्शन करताना मा.अनिल भोकरे साहेब कृषी उपसंचालक,जळगाव.यावेळी तरुणांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याबाबत सुद्धा मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी श्री सिनारे साहेब यांनी अंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ बाबत उपस्थितांना माहिती दिली.यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री अजय खैरनार,तेजस पाटील तसेच नेहरू युवा केंद्राचे इतर सदस्य उपस्थित होते.