मौजे चावरे मधील चावरे माध्यमिक विद्यालय चावरे येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थी पोषण जागरूकता मोहिमे अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला.

तारीख- ७.08.२०२३ रोजी मौजे चावरे मधील चावरे माध्यमिक विद्यालय चावरे येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थी पोषण जागरूकता मोहिमे अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. मुख्याध्यापक श्री. सनदे सर यांनी प्रास्तविक व स्वागत केले. मंडळ कृषी अधिकारी श्री.शेखर सुळगावकर यांनी पौष्टिक तृणधान्य ज्वारी, बाजरी, राजगिरा, वरई, नाचणी, राळा इत्यादीचे आहारातील महत्त्व व फायदे सांगितले. श्री. अजय भंडारी कृषी सहायक यांनी पौष्टिक तृणधान्याच्या बियाणांची ओळख, व त्यांचे महत्व घोष वाक्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगितले, सर्व विध्यार्थी व शिक्षक वृंद यांना आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष ची शपथ दिली. कार्यक्रमाचे आभार कृषी सहाय्यक श्री.अजय भंडारी यांनी मानले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →