कुमार व कन्या विद्यालय,उंचगाव येथे प्रधानमंत्री पौष्टिक शक्ती निर्माण अभियान अंतर्गत जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला

कुमार व कन्या विद्यालय,उंचगाव येथे प्रधानमंत्री पौष्टिक शक्ती निर्माण अभियान अंतर्गत जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी 450 विद्यार्थी उपस्थित होते. 5 वी ते 7 वी च्या 35 विद्यार्थीनी निबंध स्पर्धेत सहभाग घेतला,10 विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला.चित्रकला स्पर्धे मध्ये 2 विद्यार्थीनी भाग घेतला.मुले व मुली यांनी 2 पौष्टिक तृणधान्यचे आहारातील महत्व या विषयावर नाटिका सादर केली.प्रसंगी शाळा कमिटीचे चे अध्यक्ष कृष्णात रेवडे व उपाध्यक्षक गणेश नागटीळक व सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.यावेळी प्रत्येक गटातील 3 विद्यार्थी चा नंबर काढून त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.व राजगिरा लाडू चे वाटप करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →