जयवंत हायस्कूल, लाटवडे, (जिल्हा-कोल्हापूर) येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रम.

गुरुवार दिनांक – ३/८/२०२३ रोजी “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” निमित्त “विद्यार्थी पोषण जागरूकता मोहिम-कार्यक्रम” अंतर्गत, जयवंत हायस्कूल, लाटवडे, जिल्हा-कोल्हापूर येथे पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व पौष्टिक तृणधान्याची ओळख व मिलेट ऑफ द श्रावण मंथ म्हणून राजगिरा उपयुक्त ते विषयी माहिती देण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थित श्री. सुळगावकर , मंडळ कृषी अधिकारी पेठ वडगाव यांनी विद्यार्थ्यांना विविध तृणधान्यांचे महत्त्व व त्यापासून मिळणारे घटक तसेच पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 या संकल्पनेबाबत विस्तृत माहिती दिली. यावेळी कृषी सहाय्यक भाडोळे ,जयवंत हायस्कूल लाटवडे सर्व स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते..

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →