दिनांक 10.02.2023 रोजी मौजे मोऱ्हांडा पैकी तुळ्याचा पाडा येथील समाजमंदिर सभागृहात अंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त तालुका कृषी कार्यालय मोखाडा मार्फत आहारातील पौष्टिक तृणधान्य चे महत्व संबंधी प्रचार, प्रसिद्धी व जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला.
सदर वेळी मोऱ्हांडा- गोंदे(बु) ग्रामपंचायत सरपंच श्री देविदास जी निसाळ, ग्राम पंचायत सदस्य तसेच
श्री सुनीलजी पारधी, तालुका कृषि अधिकारी मोखाडा, मंडळ कृषी अधिकारी, मोखाडा श्री प्रेमदासजी राठोड, कृषी पर्यवेक्षक, पोशेरा श्री रामराव जगताप उपस्थित होते
सदर कार्यक्रमास अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या व शेतकरी समुदाय उपस्थित होता.
सदर कार्यक्रमासाठी श्रीमती सोनाली पाटील यांनी विविध पौष्टिक तृणधान्य पासून नागली लाडू, नागली बर्फी, नागली अप्पे, ज्वारीचे घावने ई. पदार्थ स्वतः तयार करून आणले होते.
🌸🌸🌸🙏