डहाणू तालुक्यातील बोर्डी येथे महिला बचत गटास पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना व पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

आज दिनांक-१०/०२/२०२२ रोजी मोजे- बोर्डी येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग(PMFME) , आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्री अशोक महाले सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले श्री अनिल नरगुलवार तालुका कृषी अधिकारी डहाणू यांनीPMFME योजनेची उपस्थित महिला शेतकऱ्यांना माहिती दिली आणि जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आव्हान केले. श्रीमती रूपाली देशमुख (गृहविज्ञान )कृषी विज्ञान केंद्र कोसबाड यांनी आहारामध्ये तृणधान्य नागली वरई ज्वारी बाजरी राजगिरा यांचा वापर करून आरोग्य चे समतुल राखले पाहिजे इत्यादीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. श्री. जगदीश पाटील मंडळ कृषि अधिकारी यांनी खरीप हंगामात प्रात्यक्षिक म्हणून तृणधान्ये ची बियाणे उपलब्ध करून दिले जाईल त्या करीत आपले सहकार्य करावे असे आव्हान केले.यावेळी स्फूर्ती महिला बचत गटाच्या अध्यक्ष-उर्मिला करमरकर,श्री. नामदेव वाडीले तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, कृषि सहाय्यक, संदीप धामोडे, शरद मुडा ,DRP स्वप्नील चुंभले उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →