माळकरंजा ता. कळंब येथे महिला बचत गटांना पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील माळ करंजा येथे आज दिनांक ०३/०२/२०२३ रोजी महिला बचत गटांना पौष्टिक तृणधान्य बाबत माहितीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मंडळ कृषि अधिकारी श्री. भुजंग लोकरे यांनी उपस्थितांना पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन केले. तसेच आहारातील त्याचे महत्व समजावून सांगितले. २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्याबद्दल सर्व तृणधान्ये जसे कि राळा, राजगिरा ज्वारी बाजरी नाचणी सावा कोदू कुटकी भगर (वरई ) इ. बाबत माहिती तसेच त्यांचे पोषणमूल्य इ बाबत माहिती उपस्थितांना देण्यात आली. सदर कार्यक्रमास गावातील सर्व बचत गटातील महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमास गावातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते. हा कार्यक्रम मंडळ कृषि अधिकारी श्री. भुजंग लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →