आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष निमित्त महिला मेळावा….

2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. ज्वारी, बाजरी ,नाचणी , राजगिरा यासारखे तृणधान्य ही आरोग्याला पोषक असतात. याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने तालुका कृषी अधिकारी सेलू तर्फे विविध गावात जनजागृती केली जात आहे .
याचाच एक भाग म्हणून दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी तालुका कृषी अधिकारी सेलू एस.टी.पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणिता घंटलवाड, कृषी सहाय्यक यांनी मौजे बोरकिनी येथे संक्रांती निमित्ताने महिला शेतकरी मेळावा आयोजित केला. तृण धान्याचे आपल्या शरीरातील महत्त्व, तसेच लहान मुलांपासून वृद्धापर्यंत तृणधान्य आपल्यासाठी किती फायदेशीर आहे हे सविस्तरपणे सांगितले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →