मंगळवार दिनांक २३/०१/२०२३ रोजी मौजे माजगाव येथे व “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” अंतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात

अक्षय चव्हाण कृषि सहाय्यक कोलगांव मार्गदर्शन करताना

मंगळवार दिनांक २३/०१/२०२३ रोजी मौजे माजगाव ता. सावंतवाडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” अंतर्गत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमास सरपंच श्रीमती संजना सावंत मॅडम व ग्राम पंचायत सदस्या मधू कुंभार मॅडम व
श्रीमती. सुप्रिया निरवडेकर मॅडम कृषी सहाय्यक माजगाव तसेच् श्री.अक्षय चव्हाण कृषी सेवक कोलगाव विद्यार्थी
व शेतकरी वर्ग उपस्थित होता.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कृषीसाहय्यक श्रीमती सुप्रिया निरवडेकर यांनी केले, व
श्री. अक्षय चव्हाण साहेब यांनी उपस्थित शेतकऱ्यांना व विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले.
आयोजित आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” मेळाव्याला विद्यार्थी वर्गाकडून उस्फूर्द प्रतिसाद मिळाला.
सदर वर्गाला श्री अक्षय चव्हाण यांनीतृणधान्या चे आहारातील महत्व सांगितले.व आधुनिक जीवन पद्धतीमध्ये तृण धान्याचे महत्व व् तृणधान्य ओळख या विषयीं सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाची सांगता श्रीमती सुप्रिया निरवडेकर मॅडम यांनी तृणधान्य प्रतिज्ञा घेऊन केली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग

Learn More →