आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त तळा येथे प्रभात फेरीचे आयोजन.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त तळा येथे प्रभात फेरीचे आयोजन.

संयुक्त राष्ट्राने 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले असून त्या अनुषंगाने कृषी विभाग यांचे वतीने निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पाककला स्पर्धा, तृणधान्य पिकाखालील क्षेत्र वाढवणे, आहार तज्ञांचे मार्गदर्शन या सारखे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून तालुका कृषी अधिकारी श्री आनंद कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली गोपीनाथ महादेव वेदक विद्यामंदिर येथील विद्यार्थांच्या मदतीने प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक उपस्थित होते. कुपोषण समस्या व पोषणमूल्य सुधारण्याच्या दृष्टीने आहारात तृणधान्याचा वापर वाढवणे, नाचणी, वरी, राजगिरा पिकांची लागवड क्षेत्र वाढ करणे, नवीन पिढीला तृणधान्याचा आहाराचे महत्त्व पटवून देणे याकरिता जनजागृती करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.यावेळी मार्गदर्शन करताना श्री सागर वाडकर मंडळ कृषी अधिकारी यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच मधुमेह ,कॅन्सर, हृदयविकार हाडांचे आजार यासारख्या आजारांना नवी पिढी बळी पडत असून समतोल व पौष्टिक तृणधान्य आहारात समावेश करणे ही काळाची गरज आहे त्यामूळे सर्वांनी आठवड्यातून किमान २ दिवस तरी पौष्टिक तृणधान्यचा आहारामध्ये समावेश करण्याचे आवाहन केले. त्यानंतर तळा शहरांमधून प्रभातफेरी काढण्यात आली यामध्ये तृणधान्य विषयक महत्व सांगणारे पोस्टर व घोषणा देऊन चंडिकामाता मंदिर येथे प्रभातफेरीचा समारोप करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग म वेदक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री धुमाळ सर व त्यांचे इतर सहकारी शिक्षक यांनी मोलाचे सहकार्य केले., शेवटी श्री आंबेगावे सर यांनी आभार प्रदर्शन करून कायक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →