मौजा साखरवाही, ता. राजुरा येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत पौष्टिक तृणधान्य रब्बी ज्वारी प्रात्यक्षिकाचे आयोजन

मौजा साखरवाही येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत पौष्टिक तृणधान्य रब्बी ज्वारी प्रात्यक्षिकास प्रकल्पातील शेतकऱ्यांसह भेट देऊन रब्बी ज्वारी पिकावरील कीड व रोग नियंत्रणाबाबत प्रत्यक्ष क्षेत्रावर शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले .तसेच मिरची पिकाचे पीक व्यवस्थापन तसेच रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाचे कीड व रोग व्यवस्थापन तसेच पेरू फळबागेचे महत्त्व इत्यादी बाबत सविस्तर माहिती प्रत्यक्ष क्षेत्रावर शेतकऱ्यांना देण्यात आली .तसेच त्यानंतर शेतकऱ्यांची सभा घेऊन शेतकऱ्यांना प्रकल्प अंतर्गत निविष्ठाकीट चे वाटप करण्यात आले आणि प्रधानमंत्री सुषमांना प्रक्रिया उद्योग, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ,कृषी यांत्रिकीकरण ,एकात्मिक फलोत्पादन अभियान इत्यादी योजनाबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती कृषी सहाय्यक श्री .पी .जे. खिल्लारे यांनी दिली .

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →