आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन 2023 अंतर्गत भोगी व संक्रांती निम्मित मौजे रायगाव तालुका-जावळी,जिल्हा -सातारा येथे महिला मेळाव्याचे आयोजन

मौजे रायगाव तालुका-जावळी,जिल्हा -सातारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष सन 2023 अंतर्गत भोगी व संक्रांती निम्मित तालुका कृषी अधिकारी जावळी रमेश देशमुख व मंडळ कृषी अधिकारी कुडाळ ज्ञानदेव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली, महिला मेळावा घेण्यात आला .सदर कार्यक्रमासाठी मार्गदर्शक वक्ते श्री. डी बी जाधव, कृषी सहाय्यक व्ही टी मोहिते ,डी वाय सापते कृषी सहाय्यक व महिलां शेतकरी उपस्थित होत्या .सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या महिला शेतकरी यांना श्री. डी बी जाधव यांनी नाचणी ,वरई , राजगिरा, ,ज्वारी व बाजरी इत्यादी पौष्टिक तृणधान्य पिकांसंदर्भात सदर पिकांचे आहारातील असलेले महत्त्व व फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सौ. मनीषा निकम यांनी उपस्थित असणारे मान्यवर व महिला शेतकऱ्यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →