“महिला गटांनी पौष्टिक तृणधान्यास आरोग्यासोबतच व्यावसायिक दृष्टिकोनातून पहावे”

स्वयं शिक्षण प्रयोग द्वारे आयोजित उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील विविध गावातील महिला प्रतिनिधी यांच्या संवाद कार्यशाळेत “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष-2023” च्या अनुषंगाने मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मंडळ कृषी अधिकारी,ईट श्री निखिल रायकर यांनी महिलांना पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्व समजावून सांगितले. तसेच महिला बचत गटाच्या मार्फत नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठी पौष्टिक थाळी, हुरडा पार्टी,तृणधान्य पदार्थ विक्रीसाठी स्टॉल लावणे, ज्वारी चे क्लिनिंग ग्रेडिंग करून शहरात मार्केटिंग करणे,प्रक्रिया उद्योग उभारणे इ संधी असल्याचे सांगून महिलांनी पुढे आल्यास कृषी विभागामार्फत सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले. यावेळी स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेच्या तालुका प्रमुख व संस्थेच्या तालुक्यातील इतर सदस्या उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वयंशिक्षण प्रयोग च्या स्थाणूक सदस्यांनी विशेष प्रयत्न केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →