शेतकऱ्यांना यावर्षीपासून उत्पन्न वाढविण्यासाठी संधी” शेतकरी मेळाव्यात कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

पौष्टिक तृणधान्य विकासासाठी ठरवलेल्या सप्तसूत्रीनुसार भूम तालुक्यातील पाथरूड परिसरात ज्वारी पीक उत्पादकांची वाटचाल सुरू आहे.यामध्ये शेकडो एकर क्षेत्रावर ज्वारीचे सुधारीत वाण पेरणी करून त्यासाठी ठिबक सिंचन चा अवलंब केला आहे.विक्री-पश्चात सेवा पुरवठा अंतर्गत बालसन पॉलिप्लास्ट या सूक्ष्मसिंचन संच उत्पादक कंपनी व साई इरिगेशन पाथरूड यांच्या द्वारे भूम तालुक्यातील आनंदवाडी शिवारात शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.येथील मंडळ कृषी अधिकारी श्री निखिल रायकर यांनी शेतकऱ्यांना ज्वारी पिकाचे सुधारित वाण,बीजप्रक्रिया, पेरणी,कीड रोग व्यवस्थापण व पाणी व्यवस्थापन याबाबत माहिती दिली.

यासोबतच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटामार्फत ज्वारी विक्रीचे नियोजन करावे.यासाठी खाण्यास रुचकर असणारे वाण क्लिनिंग ग्रेडिंग करून शहरात अपेक्षित वजनाचे पॅकिंग करून विक्री केल्यास अधिकचा नफा मिळेल.तसेच परिसरातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना ज्वारी वरील प्रक्रिया उद्योगास मोठी संधी असल्याचे सांगितले.याबाबत शेतकऱ्यांनी सकारात्मक विचार करून एकत्र यावे,त्यांना कृषी विभागामार्फत वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल असे आवाहन केले.

आयोजकांनी ज्वारी च्या शेताजवळच घेतलेल्या शेतकरी मेळाव्यात उपस्थितांना जेवणाचे नियोजन केले होते यात देखील जानेवारी महिन्याचे विशेष पौष्टिक तृणधान्य म्हणजे ‘मिलेट ऑफ मंथ’ असलेल्या बाजरी च्या भाकरीचा समावेश केला होता ही विशेष बाब. यावेळी कंपनीचे जालना येथील प्रतिनिधी श्री कटोरे,साई इरिगेशन चे श्री नागरगोजे,कृषी पर्यवेक्षक श्री गलांडे,कृषी सहायक श्री चंदनशिवे, श्री गायकवाड व परिसरातील शेतकरी उपस्थित होते कृषि सहायक यांनी कार्य्मासाठी उपस्थित मान्यवर अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →