जागतिक पौष्टिक तृणधान्य दिनानिमित्त मौजे बोरवटी तालुका जिल्हा लातूर येथे प्रशिक्षण कार्यक्रम.

जागतिक पौष्टिक तृणधान्य दिनानिमित्त मौजे बोरवटी तालुका जिल्हा लातूर येथे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. सदर प्रशिक्षण कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र लातूर येथील गृह विज्ञान विभाग प्रमुख श्रीमती अंजली गुंजाळ मॅडम यांनी पौष्टिक तृणधान्य चे महत्व व त्याच्यापासून करावयाच्या पाककृती विषयी सविस्तर माहिती दिली. कृषी अधिकारी श्रीमती योगिता आरदवाड  यांनी पौष्टिक तृणधान्य विषयी स्वतःचे अनुभव कथन केले .तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्य कृषी विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबाबत माहिती दिली तसेच आपल्या आहारात पौष्टिक तृणधान्याच्या समावेश करण्याबाबत आवाहन केले. पौष्टिक तृणधान्याचा क्षेत्र विस्तार होण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे असे सांगितले. याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक श्री चौधरी व उपसरपंच श्री माने उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी सहाय्यक श्रीमती खाडे व आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री सचिन हिंदोळे यांनी प्रयत्न केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर

Learn More →