आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य चंद्रपूर जिल्ह्याची जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक मा. जिल्हाधिकारी श्री विनय गौडा, जी.सी., भा.प्र.से. यांचे अध्यक्षतेखाली वीस कलमी सभागृह, चंद्रपूर येथे दिनांक ११ जानेवारी २०२२ रोजी पार पडली. या बैठकीत श्री मुरुगानंथम एम. भा.प्र.से., सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर, श्री भाऊसाहेब ब-हाटे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक, आत्मा, चंद्रपूर, श्री रविंद्र मनोहरे, कृषि उपसंचालक तथा जिल्हा नोडल अधिकारी, महामिलेट, श्री अशोक गराटे, उपायुक्त, महानगर पालिका, चंद्रपूर, डॉ. विनोद नागदेवते, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही, श्री राजेश येसनकर, जिल्हा माहिती अधिकारी, सौ. कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), डॉ. वनिता गर्गेलवार, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग, श्री लक्ष्मीनारायण दोडके, कृषि विकास अधिकारी, जि.प., महिला बाल विकास विभागाचे प्रतिनिधी, श्री मनोहर वाकडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक, (MSRLM), श्री श्रीराम चन्ने, LDC, माविम, अमित चावरे, सल्लागार,माविम आणि श्री गणेश मादेवार, मुल्य साखळी तज्ञ, स्मार्ट प्रकल्प हे उपस्थित होते. या बैठकीत श्री भाऊसाहेब ब-हाटे यांनी “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य चंद्रपूर जिल्ह्याचे तालुकानिहाय आणि महिनानिहाय नियोजनाचे सादरीकरण केले. मा. जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागांनी पौष्टिक तृणधान्य आंतरराष्ट्रीय वर्षात सक्रीयपणे सहभागी होऊन आपापल्या विभागाचे उपक्रम यशस्वीरीत्या राबवावे, असे आवाहन केले.