राजे छत्रपती संभाजी विद्यालयात “आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षं -2023” निमित्त कार्यक्रम संपन्न….

🌾 🌾🌾🌾🌾🌾🌾
चला पौष्टिक तृणधान्यांचा आहारात वापर करू या…..
🌾🌾🤷🏻‍♀️🤷‍♂️🌾🌾🌾

राजे छत्रपती संभाजी विद्यालयात “आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षं -2023” निमित्त कार्यक्रम संपन्न….

धुळे – जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित राजे छत्रपती संभाजी विद्यालय,देवपूर, धुळे येथे जिल्हा कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि.09/08/2023 बुधवार रोजी “पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व व विद्यार्थी जनजागृती रॅली” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रम प्रसंगी मा.श्री वाल्मीक प्रकाश (ता.कृ.अधिकारी,धुळे) यांच्या उपस्थितीत,प्रमुख मार्गदर्शक श्रीमती मनीषा पाटील (म.कृ.अधिकारी, सोनगीर) तसेच श्रीमती प्रतिभा पाटील (कृषी सहाय्यक,बोरीस) यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.शर्मिला शिंदे यांचेसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमांचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन उपशिक्षिका श्रीमती सी.जी.दोरकर व श्री.ए.एस.पाटील सर यांनी केले.
कार्यक्रम प्रसंगी मंडळ कृषि अधिकारी श्रीमती मनीषा पाटील यांनी प्रथमतः कार्यक्रम आयोजना ची रूपरेषा स्पष्ट करत,आधुनिक जीवन शैलीनुसार आपल्या दैनंदिन आहारात बदल झाला आहे.या बदलत्या आहारामुळे शरीरास आवश्यक पोषक तत्त्वांची उणीव भरुन काढून होणाऱ्या आजारांवर मात करण्याची गरज निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पारंपारिक आहाराला चालना देत सर्वसामान्यांना आरोग्यसंपन्न जीवन जगता यावे यासाठी शासनाने पौष्टिक तृणधान्याचा आहारात वापर वाढविण्याचा अभिनव कार्यक्रम हाती घेतला आहे. भविष्यातील सुदृढ व आरोग्यदायी समाजासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा भाग होऊन पौष्टिक तृणधान्यांचा आहारात नियमित वापर करण्याची आवश्यकता आहे.
असे प्रतिपादन केले.
कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना प्रोजेक्टरच्या माध्यमातून चित्रफित प्रदर्शित करून तृणधान्य म्हणजे काय ? तसेच पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व अधोरेखित केले.
आहारातील पोषकतत्व अभावी ग्रामीण व शहरी भागात आजाराचे प्रमाण वाढत असून विद्यार्थ्यांनी आपल्याआहारात तृणधान्याचा समावेश‌ करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
आजच्या धावपळीच्या युगात आपले पारंपरिक Nutritional Cereal Awareness अन्नधान्ये व पौष्टिक आहार सोडून फास्टफूड व विविध पॅकींग फूडचा वापर आपण करत आहोत. त्यामुळेच महिला पुरुष, लहान मुले,वृद्ध व्यक्ती यांचे विविध आजारांना बळी पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे आपल्या आहारात पारंपरिक पौष्टिक तृणधान्याचे महत्व अनन्य साधारण आहे.
या पिकांमध्ये ज्वारी,बाजरी,राळा, नाचणी,भगर,राजगिरा ,सावा,कुटकी आदी प्रमुख पिके आहेत.तसेच ही पिके कमी पाण्यात व कमी खर्चात येणारी असून यापासून जनावरांनाही सकस चारा उपलब्ध होतो. त्यामुळे ही पिके शेतकर्‍यांनाही आर्थिकदृष्ट्या फायद्याची ठरू शकतात.
आपल्या पूर्वजांच्या आहारामध्ये ज्वारी, बाजरी,नाचणी, वरी,रागी,राजगिरा अशा तृणधान्यांचा आहारामध्ये समावेश होता. यापासून शरीरास लागणारे महत्त्वाचे घटक प्रथिने,लोह, खनिज,तंतुमय पदार्थ जीवनसत्वे मुबलक प्रमाणात मिळत होते.तंतुमय पदार्थामुळे पोटाचे विकार,पचनाचे विकार बद्धकोष्ठता असे विकार होत नाहीत.यासाठी आहारात पौष्टिक तृणधान्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, जीवनसत्वामुळे आतड्यांचा आजार लहान मुलांमध्ये, गरोदर महिलांमध्ये हिमोग्लोबिन लोह यांचा स्तर वाढतो यासाठी बाजरीचे सेवन सुद्धा खूप महत्त्वाचे आहे
या विषयी माहिती विषद केली.
कार्यक्रम समारोप प्रसंगी विद्यार्थी – जनजागृती रॅलीचे आयोजन करुन कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम प्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →