डहाणु तालुक्यातील मौजे रणकोळ येथील शाळेतील विद्यार्थाना पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

आज गुरूवार दिनांक10/8/2023 रोजी मौज: रणकोळ (पारधीपाडा)येथे शासकीय आश्रमशाळा रणकोळ येथील शाळेमध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ति निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य जागृकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला.या वेळी पौष्टिक तृणधान्य विषयी आहारातील महत्त्व पटवून दिले. यावेळी सर्वांनी आठवड्यातून किमान एक दिवस पौष्टिक तृणधान्याचे खाद्यपदार्थांचे सेवन करू अशी शपथ घेतली. शाळेतील मुख्यध्यापक व शिक्षक वृंद व विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. सदर कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी वाणगाव पवार साहेब, कृषी पर्यवेक्षक गायकवाड साहेब, कृषी सहायक राबड मँडम व कृषी सहाय्यक थोरात साहेब हजर होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →