रायगड जिल्यातील कर्जत तालुक्यात प्रभात फेरी द्वारे पौष्टिक तृणधान्याविषयी प्रचार

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिना निमित्त मौजे बीड बु तालुका कर्जत जिल्हा रायगड येथे मा जिअकृअ श्रीम बाणखेले मॅडम व मा उविकृअ श्री ताटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला…..सदरहू कार्यक्रमामध्ये प्रथमतः प्राथमिक शाळेतील मुलांची प्रभातफेरी पूर्ण गावातुन काढण्यात आली …त्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला

सदरहू कार्यक्रमात कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी तसेच शेतकरी महिला यांनी पौष्टिक तृणधान्य पासून बनविलेल्या विविध recipe तयार आणलेल्या होत्या .

सदरहू कार्यक्रमात मा उपविभागीय कृषी अधिकारी श्री ताटे साहेब , प्राथमिक शाळा शिक्षिका श्रीम पुरी मॅडम ,तालुका कृषी अधिकारी श्री शितल शेवाळे यांनी पौष्टिक तृणधान्य चे महत्व पटवून दिले.तसेच कृप नेरळ गलांडे यांनी PMFME संदर्भात सविस्तर माहिती दिली.तसेच कृस व कृप यांनी विविध recipe तयार करण्याच्या पध्दतीविषयी सविस्तर माहिती दिली.

सदरहू कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित शेतकरी वर्गाला भोगीची भाजी व बाजरीची भाकरीचे जेवण दिले.

सदरहू कार्यक्रमाचे नियोजन मंडळ कृषी अधिकारी कर्जत कोळी साहेब ,मंडळ कृषी अधिकारी कशेळे गायकवाड साहेब तसेच सर्व कृषी पर्यवेक्षक , कृषी सहायक व ATM ,BTM यांनी केले.सदरहू कार्यक्रमाला बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृप कळंब श्री सचिन केणे यांनी केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →