डहाणू मधील मौजे धामणगाव कोमपाडा येथील आदिवासी दिननिमित्त आयोजित कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्य लागवड क्षेत्र वाढवणे बाबत मार्गदर्शन

बुधवार दिनांक ९ ऑगस्ट २०२३
मौजे धामणगाव कोमपाडा येथे
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून आश्रमशाळा विद्यार्थी आणि शेतकरी ग्रामस्थ यांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व पटवून दिले. आताची नवीन पिढीने शेतीकडे लक्ष देवून जास्तीत जास्त प्रमाणात नाचणी , वरई लागवड क्षेत्र वाढवावे. जेणेकरून भविष्यात या पौष्टिक तृणधान्यास चांगली बाजारपेठ तयार करता येईल. आपल्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असे हे जुन व पारंपारिक नाचणी पीक आपण पुन्हा पुनर्जीवित करावे असे आवाहन जगदीश पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमाचे वेळी अदानी फाऊडेशन चे वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते त्यानी शेतकऱ्यांना फळझाडे वाटप करुन फळबाग वाढवणे साठी कृषि विभागाची मदत घेणे बाबत आवाहन केले. अदानी फाऊडेशन च्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले.
यावेळी उत्कृष्ट काम केलेबद्दल कृषि सहाय्यक श्री. विशाल नाईक यांचा अदानी फाउंडेशन चे मुख्य अधिकारी यांचे पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →