दि. 02/08/2023 रोजी मौजा खांबाळा ता. वरोरा येथे प्रांगणात प्रधानमंत्री पोषण शक्ती जनजागृती कार्यक्रम

दिनांक 2/8/2023 रोजी मौजा- खांबाडा ता. वरोरा येथील छत्रपती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रधानमंत्री पोषण शक्ति निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्व याविषयी श्री किशोर डोंगरकार, कृषि पर्यवेक्षक टेमुर्डा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच पौष्टिक तृणधान्य लागवड पद्धती व आहारातील महत्व याविषयी श्री दिपक चौरे कृषि सहायक खांबाडा यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले व पौष्टिक तृणधान्य च्या बियाणे किट वाटप करण्यात आले. ऑगस्ट महिना *राजगिरा *करिता समर्पित असल्यामुळे विद्यार्थ्यांना राजगिरा लाडू खाऊ म्हणून वाटप करण्यात आला व त्याचे महत्व पटवून देण्यात आले. प्रसंगी शाळेतील शिक्षक श्री धोटे सर, इतर शिक्षक वृंद व विद्यार्थी  उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →