दि.8/8/2023 रोजी मौजे: वडगाव प्र.ए.तालुका पारोळा येथील जि.प.प्राथमिक शाळा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त जागरूकता…

दि.8/8/2023 रोजी मौजे: वडगाव प्र.ए.तालुका पारोळा येथील जि.प.प्राथमिक शाळा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण करणे योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्ये बाबत जागरूकता निर्माण करणे साठी कृषी विभागामार्फत कार्यक्रम घेण्यात आला.यात पौष्टिक तृणधान्य ओळख,व्याप्ती व त्याचे आहारातील महत्त्व याविषयी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच पुढील पिढीसाठी त्यांच्या आरोग्यासाठी तृणधान्याचे महत्त्व विशद केले. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्ये पिठापासून,शिजवून तसेच प्रक्रिया करून तयार होणाऱ्या पदार्थांची माहिती कृषी सेवक श्री.विशाल बोचरे यांनी दिली. सदर कार्यक्रमास शिक्षक श्री. अनिल पाटील ,शिक्षक वर्ग,कृषी मित्र श्री. पंडित चव्हाण व शाळेतील सर्व विद्यार्थी यांची उपस्थिती होती..

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →