चाळीसगाव – मिलेट ऑफ द मंथ राजगिरा पिकाविषयी जनजागृती…

चाळीसगाव तालुक्यातील राष्ट्रीय विद्यालय येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य( मिलेट) जागृतता निर्माण करणेसाठी मा. तालुका कृषि अधिकारी श्री किशोर हाडपे सर यांनी आहारात तृणधान्यांच्या समावेशाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवुन दिले तसेच ‘मिलेट ऑफ द मंथ’च्या संकल्पनेत ऑगस्ट महिना हा राजगीरा पिकासाठी समर्पित असल्याने राजगीरा पिकाविषयी जनजागृती करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी राष्ट्रीय विद्यालयाचे प्राचार्य श्री पवार सर, इतर शिक्षकवृंद, मकृअ घोरपडे एम एन, कृ प वाघ ए टी , सोनवणे एस व्ही उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आहारात पौष्टीक तृणधान्य समावेश करणेची शपथ घेतली.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →