डहाणू तालुक्यातील मौजे जामशेत येथे मा सरपंच यांचे हस्ते पौष्टिक तृणधान्य मिनिकिट वाटप व मार्गदर्शन

आज दिनांक १४ जुलै रोजी जामशेत गावाच्या ग्रामपंचायत सभागृहात मा. सरपंच श्री. विकास दौडा यांचे अध्यक्षतेखाली पौष्टीक तृणधान्य लागवड आणि महत्त्व याबाबत मार्गदर्शन सभा संपन्न झाली. मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड आणि भात पिकच्या चारसूत्री लागवडी बाबत माहिती देण्यात आली. यावेळी कृषि पर्यवेक्षक श्रीमती विशेमॅडम यांनी पौष्टिक तृणधान्य नागलीचे आहारातील महत्व समजावून सांगितले. लागवड कशी करावी याबाबत माहिती दिली. मंडळ कृषि अधिकारी जगदीश पाटील यांनी पौष्टीक त्तृणधान्य लागवड करुन आपल्या रोजच्या आहारात वापर वाढविल्यास आपली प्रतिकार शक्ती वाढून आपले आरोग्य चांगले राहिल असे सांगितले. यासाठी कृषि विभाग ग्रामस्तरावर नागलीचे मिनिकिट वाटप करीत आहे. याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा , असे आवाहन केले. जामशेत गावाचे सरपंच यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आपल्या कडील फॉरेस्ट आणि वरकस जागेत नागली पिकाची लागवड करून पुढील वर्षासाठी बियाणे तयार करावे असे आवाहन केले. यावेळी गावातील शेतकऱ्यांना सरपंच व उपसरपंच यांचे हस्ते नागली मिनिकिट आणि शेत तेथे पौष्टीक तृणधान्य अंतर्गत कॅफेतरिया करणेसाठी बियाणे मिनिकिट वाटप केले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे २५ शेतकरी आणि महिला उपस्थित होत्या. तसेच गावाचे कृषि सहाय्यक आणि कृषी पर्यवेक्षक हजर होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →