उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील मौजे सिरसाव येथे मकर संक्रात भोगी हा दिन पौष्टिक तृण धान्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी भूम उपविभागाचे उपविभागीय कृषि अधिकारी श्री. शुक्राचार्य भोसले , मंडळ कृषि अधिकारी श्री. कैलास देवकर गावचे कृषि सहायक श्री. राहुल जाधव , सरपंच श्री. कुमार वयकोले व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना बदलती जीवन शैली व त्यानुसार जन सामान्यांना होणारे विविध दुर्धर आजार इ बद्दल जागरूकता व्हावी व त्यावर मात करण्यासठी आपल्या रोजच्या आहारात पौष्टिक तृणधान्य यांचे महत्व समजावून सांगितले. मंडळ कृषि अधिकारी श्री. कैलास देवकर यांनी विविध पौष्टिक तृण धान्ये राजगिरा ज्वारी बाजरी राळा सावा राजगिरा इ बद्दल माहिती दिली. आभार कृषि सहायक यांनी मानले.