आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य 2023 जनजागृती कार्यक्रम मौजा सालेभाटा तालुका, लाखनी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा 14/01/2023 in Technical Tagged भंडारा - 0 Minutes मौजा सालेभाटा तालुका, लाखनी,येथे मकर संक्रांतीचे पर्वावर श्री रूपचंद मनिरामजी निर्वाण यांच्या शेतावर आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य 2023 जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये तालुका कृषी अधिकारी श्री किशोर पात्रीकर यांनी शेतकऱ्यांना पौष्टिक तृणधान्ये यांचे आहारातील महत्त्व समजावून सांगून आरोग्यदायी जीवन जगण्याचे दृष्टीने पौष्टिक तृणधान्य हे भरपूर खनिज पदार्थांनी युक्त जसे की लोह, कॅल्शियम,फॉस्फोरस तसेच तंतुमय (फायबर) पदार्थ युक्त व ग्लुटेन विरहित असल्यामुळे तसेच पचनास हलके असल्यामुळे ज्वारी,बाजरी ,भगर नाचणी,राजगिरा यांचा विविध पदार्थाचे माध्यमातून आहारात समावेश करून त्याचे प्रमाण वाढविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले व मधुमेही तसेच हृदयरोग्यांना हा आहार अधिक फायदेशीर असल्याचे सांगितले. मंडळ कृषी अधिकारी आर. आर. कोळी यांनी यांनी नाचणी तृणधान्यापासून बनविण्यात येणारे पदार्थ व त्याचे महत्त्व याविषयी माहिती दिली. श्री प्रशांत भोयर कृषी सहायक यांनी पौष्टिक तृणधान्याची ओळख पटवून दिली व पारंपारिक महत्त्व सांगितले तसेच बदलत्या गरजेनुसार आपले भागात सुद्धा ज्वारी सारख्या पिकाची रब्बी हंगामात भविष्यात लागवड होऊ शकेल असे सांगितले. कार्यक्रमाला कृषी पर्यवेक्षक श्री जयदेव वाढई , उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक श्री शशिकांत तलमले , माजी सरपंच सौ पुष्पलता सोनवणे, माजी उपसरपंच श्री जगदीश टेंभूर्णे, तंटामुक्ती अध्यक्ष गणराज पारधीकर, कृषी सहाय्यक श्री एकनाथ पाखमोडे , वंजारी सर, कृषी सखी,सीआरपी व गावातील पुरुष व महिला शेतकरी उपस्थित होते.प्रस्तावना कु.निर्मल भोंगाडे कृषी सहायक यांनी केली असून कृषी सहाय्यक त्रिवेणी बेलखोडे यांनी आभार मानले. उपस्थितांना पौष्टिक तृणधान्ये भगर (वरई तांदूळ)चा नाश्ता देण्यात आला. शेअर करा...