शासकीय योजनांचा लाभ घेवून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी साधली आर्थिक उन्नती.

कोल्हापूर जिल्हा कृषी महोत्सव व “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” निमित्त पौष्टिक तृणधान्याच्या जनजागृतीसाठी राशिवडे, तालुका- राधानगरी, जिल्हा- कोल्हापूर येथे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कोल्हापूर जिल्हा कृषी क्षेत्रात प्रगतशील जिल्हा आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक व नाविन्यपूर्ण शेती तंत्रज्ञानाविषयी माहिती देण्याबरोबरच बाजाराभिमुख कृषी उत्पादनाला व विपणनाला देण्याच्या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगराळ आणि दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक येथे जिल्हा कृषी महोत्सव भरवण्यात आला होता. या महोत्सवात विविध भागांतील शेतकरी, उद्योजक, महिला बचत गट सहभागी झाले होते. शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन अनेक शेतकरी, नागरिक आर्थिक उन्नती साधत आहेत..

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →