पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पौष्टिक तृणधान्य आधारित पाककला स्पर्धेचे आयोजन दिनांक 24 मार्च 2023 रोजी मोदी मैदान गोंदिया येथे करण्यात आले होते
दैनंदिन मानवी आहारामध्ये पौष्टिक तृणधान्य जसे ज्वारी बाजरी नाचणी कुटकी राजगिरा इत्यादी पौष्टिक धान्यांचा समावेश व्हावा पौष्टिक तृणधान्यांपासून तयार होणाऱ्या पदार्थांना प्रोत्साहन मिळावं या दृष्टिकोनातून सदर पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
स्पर्धेमध्ये विविध बचत गटांच्या महिलांनी तसेच इतरही महिला स्पर्धकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. स्पर्धेमध्ये महिलांनी ज्वारी बाजरी नाचणी कुटकी राजगिरा इत्यादी तृणधान्यांपासून तयार होणारे विविध पदार्थ जसे ज्वारीचे लाडू, बाजरीची खीर, बाजरीची भाकरी, चकली ,थालीपीठ, चीला, वडे, इडली ,पराठे इत्यादी पदार्थ तयार करून स्पर्धेमध्ये ठेवले होते
स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांसाठी प्रथम बक्षीस पाच हजार रुपये, द्वितीय बक्षीस तीन हजार रुपये व तृतीय बक्षीस दोन हजार रुपये याप्रमाणे बक्षीसे ठेवण्यात आलेली होती
स्पर्धेला परीक्षक म्हणून डॉक्टर ईश्वरी खटवानी ,प्राध्यापक एस एस गर्ल्स कॉलेज गोंदिया, डॉ प्राजक्ता डोंगरवार,आहारतज्ञ सहयोग रुग्णालय गोंदिया या लाभल्या होत्या. परीक्षकांनी सर्व स्टॉल्सना भेटी देउन महिलांनी तयार केलेल्या पदार्थांची चव घेऊन स्पर्धेचे परीक्षण करून निकाल जाहीर केले, यामध्ये श्रीमती मीनाक्षी बागडे कारंजा तालुका गोंदिया यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, मातोश्री महिला बचत गट छोटा गोंदिया यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला, श्रीमती नेहा राजेंद्र दीक्षित गोंदिया यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
विजेत्यांना परीक्षक म्हणून लाभलेल्या डॉक्टर प्राजक्ता डोंगरवार, डॉक्टर ईश्वरी खटवानी, श्री हिंदुराव चव्हाण जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गोंदिया, श्री संजय संगेकर जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या हस्ते बक्षीसे व प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली तसेच स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व महिलांना प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी श्री पवन मेश्राम कृषी अधिकारी गोंदिया कुमारी कुमुदिनी बोरकर मंडळ कृषी अधिकारी अर्जुनी मोर श्री नंदू वानखेडे मंडळ कृषी अधिकारी सालेकसा, श्री सतीश मार्कंड सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी महिला, आर्थिक विकास महामंडळ गोंदिया इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदिया

Learn More →