पौष्टिक तृणधान्य जिल्हास्तरीय कार्यशाळा

दि. 24 मार्च 2023 रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय गोंदिया यांचे वतीने जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य कार्यशाळेचा आयोजन मोदी मैदान, बालाघाट टी पॉईंट जवळ, गोंदिया येथे करण्यात आले होते.
गोंदिया जिल्ह्यात पारंपारिक भात पिकाला पर्याय म्हणून ज्वारी बाजरी नाचणी राजगिरा वरई इत्यादी पौष्टिक तृणधान्याचे क्षेत्र वाढावे या दृष्टिकोनातून सदर कार्यशाळेचा आयोजन करण्यात आलं होतं
कार्यशाळेला उद्घाटक म्हणून गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, गोंदिया,श्री हिंदुराव चव्हाण उपस्थित होते तसेच कृषी उपसंचालक कुमारी प्रणाली चव्हाण यादेखील उपस्थित होत्या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉक्टर सय्यद शाकीर अली, वरिष्ठ संशोधक कृषी विज्ञान केंद्र गोंदिया, डॉक्टर प्राजक्ता डोंगरवार आहारतज्ञ ,सहयोग रुग्णालय गोंदिया, डॉक्टर ईश्वरी खटवानी प्राध्यापक एस एस गर्ल्स कॉलेज गोंदिया उपस्थित होते
श्री हिंदुराव चव्हाण जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गोंदिया यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या पौष्टिक तृणधान्याच्या लागवडीबाबत माहिती दिली.
कुमारी प्रणाली चव्हाण कृषी उपसंचालक गोंदिया यांनी पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरा करण्यामागे काय उद्दिष्टे आहेत व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाची रूपरेषा काय आहे याची माहिती उपस्थित त्यांना दिली
डॉक्टर सय्यद शाकीर अली यांनी उपस्थित शेतकऱ्यांना भात पिकाला पर्याय म्हणून ज्वारी बाजरी नाचणी कसे फायदेशीर आहे व त्यांचे लागवड तंत्रज्ञान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केला
कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर प्राजक्ता डोंगरवार आहार तज्ञ रुग्णालय यांनी उपस्थित महिला व पुरुष शेतकऱ्यांना दैनंदिन आहारामध्ये पौष्टिक तृणधान्यांचा समावेश करणे का गरजेचे आहे व मानवी आरोग्य सुदृढ राहण्यासाठी ज्वारी बाजरी नाचणी वरई यांचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले
प्राध्यापक डॉक्टर ईश्वरी खटवानी यांनी ज्वारी बाजरी नाचणी को दो कुटकी इत्यादी धान्यांपासून चविष्ट व सकस पदार्थ कसे तयार करावेत याबाबत उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले
सदर कार्यक्रमाला जिल्ह्यातील पुरुष व महिला शेतकरी बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पवन मेश्राम कृषी अधिकारी , गोंदिया यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री नंदू वानखेडे मंडळ कृषी अधिकारी सालेकसा यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री भारत गोंडाने जिल्हा सल्लागार, श्री नूतन कटरे ,श्री रिजवान शेख ,कुमारी अनिता उके यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदिया

Learn More →