आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम , सुरगाणा तालुक्यातील मौजे जाहुले, बार्हे मंडळ, येथे घेण्यात आला व शेतकऱ्यांना आहारविषयक महत्व सांगण्यात आले

दिनांक २२ फेब्रुवारी २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम , सुरगाणा तालुक्यातील मौजे जाहुले, बार्हे मंडळ, येथे घेण्यात आला. सदर कार्यक्रमास मा. श्री.राजेंद्र निकम साहेब, प्रकल्प संचालक, आत्मा, नाशिक, श्री. कैलास शिरसाट साहेब, कृषि उपसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, नाशिक, जाहुले गावाचे सरपंच श्री. भोये, श्री गायकवाड साहेब, तंत्र अधिकारी, विस्तार, जिअकृअ, कार्यालय, नाशिक, डॉ. इल्हे, शास्त्रज्ञ, कृसंकेंद्र, श्री. धात्रक साहेब, कृषि अधिकारी, जि.प. नाशिक, पुरस्कार प्राप्त शेतकरी कांगणे साहेब, मंडळ कृषी अधिकारी श्री.अनिल भोर साहेब, श्री. सतिश बागुल, कृषि पर्यवेक्षक श्री. एस पी. बहिरम, कृषि सहाय्यक, श्री. हिरामण गायकवाड, श्री. बागुल एम. एम. व आत्मा विभागाचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, श्री. दिपक बिरारी तसेच शेतकरी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये जनजागृती कार्यक्रमात मा. श्री. निकम साहेबांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आंतरराष्ट्रीय तृणधान्ये वर्षं, तृणधान्यांचे आहारातील महत्त्व, उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान, तसेच आत्मा विभागाच्या विविध योजना याबाबत सविस्तर माहिती दिली. तर मा. श्री. कैलास शिरसाठ साहेबांनी कृषि विभागाच्या विविध योजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित शेतकऱ्यांचे शंका समाधान व अंमलबजावणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →