कडेपूर ता.कडेगाव जि. सांगली

भारतीय कृषी संस्कृतीचा अनिवार्य घटक असलेल्या ‘तृणधान्या’ला जागतिक स्तरावर आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संयुक्तराष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष जागतिक धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. भारताने संयुक्त राष्ट्र संघात यासंबंधीचा ठराव मांडला होता. पिकांना तृणधान्य म्हणून प्राधान्य मिळाले. तृणधान्याच्या पिकांकडे अधिक लक्ष वाढावे म्हणून भारतानेही २०१८ हे वर्ष राष्ट्रीय तृणधान्य वर्षे म्हणून साजरी केले होते. यापूर्वी देखील कृषिशास्त्रज्ञ प्रा.एम.एस. स्वामिनाथन यांनीही ‘पौष्टिक धान्य’ हा शब्द प्रचारात आणला होता. कडेगांव तालुक्यातील मौजे कडेपूर येथे मा. प्रांत अधिकारी व मा. तहसीलदार यांच्या उपस्थितीत पौष्टिक तृणधान्याचे पांपलेट वाटले वआरोग्य व आहार विषयक जनजागृती मोहीम पार पाडली.पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम विषयी तांत्रिक मार्गदर्शन मां. मंडळ कृषी अधिकारी श्री. शिंदे सरांनी केले.दैनंदिन आहारातील पौष्टिक तृणधान्याचे महत्व श्री. बामणे व श्री.चोरमले कृषी सहाय्यक, यांनी उपस्थिती शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →