बोरगाव ता.कवठेमहांकाळ जि. सांगली

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त मौजे बोरगाव, ता. कवठे महांकाळ, जि. सांगली येथे गुरुवार दि.०२/०३/२०२३ रोजी गोविंदराम जॉली चरिटेबल ट्रस्ट, मुंबई व तालुका कृषी अधिकारी कार्यालय कवठेमहांकाळ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय भव्य शेतकरी मेळावा व शेती पूरक व्यवसाय विषयक मार्गदर्शन मेळावा आयोजित करणेत आला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी, जत मा. श्री. मनोजकुमार वेताळ साहेब, तहसीलदार, कवठे महांकाळ मा.श्री. बी. जी. गोरे साहेब, पोलीस निरीक्षक, कवठे महांकाळ मा. श्री.जितेंद्र शहाणे साहेब, तालुका कृषी अधिकारी, कवठे महांकाळ मा.श्री. एम. जे. तोडकर साहेब, मंडळ कृषी अधिकारी, कवठे महांकाळ मा. श्री. विशाल पवार साहेब, मंडळ कृषी अधिकारी, ढालगाव मा. श्री. धडस साहेब, मंडळ कृषी अधिकारी, रांजणी मा. श्री. शेंडगे साहेब तसेच कृषी विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →