घाटनांदूर येथे पाककला स्पर्धा संपन्न

घाटनांदूर ता. भूम जिल्हा उस्मानाबाद येथे वाटर ऑर्गनायझेशन ट्रस्ट व कृषि विभाग यांचे संयुक्त विद्यमाने पौष्टिक तृनाधान्यावर आधारित पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत घाटनांदूर, काटेगाव, पाठरुड, गिरवली व इतर गावातील महिलांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत स्पर्धकांनी ज्वारी पासून बनवलेल्या पापड्या, इडली, उंडे पदार्थ तयार करून आणले होते. बाजरी पासून उंडे, इडली, डोसा भाकरी तसेच नाचणी पासून बनविण्यात आलेले लाडू, भाकरी, सूप इ पदार्थांनी विशेष लक्ष वेधून घेतले होते. या स्पर्धेचे विशेष आकर्षण हे होते कि या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांनी तयार करून आणलेल्या पदार्थाची रेसिपी दर्शविणारे फलक आणले होते. या स्पर्धेत एका स्पर्धकाने बाजरी पासून एकूण ३२ पदार्थ बनवून आणले होते. त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक घोषित करण्यात आले.

या स्पर्धेचे परीक्षण पठाण मैडम यांनी केले. कृषि उपसंचालक श्री. अभिमन्यू काशीद यांच्या शुभहस्ते विजेत्यांना प्रमाणपत्र वाटप केले. .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →