पौष्टिक तृणधान्य बाबत डहाणू मधील मोडगाव येथे मार्गदर्शन सभा

आज दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी ग्रामपंचायत मोडगाव येथे कृषि विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत क्षेत्रिय किसान गोष्टी, आंबा मोहर पिक सरक्षण शिबिर, आणि आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कृषि पर्यवेक्षक आंबोली श्री. मुंडे साहेब यांनी उपस्थित प्रमुख पाहुणे, प्रमुख मार्गदर्शक आणि प्रगतशील शेतकरी आणि महिला शेतकरी यांचे पुष्पगुच्छने स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात केली.
श्री.अशोक महाले सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक डहाणू यांनी संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले असल्याचे सांगितले. पौष्टिक तृणधान्यांमध्ये ज्वारी बाजरी नाचणी वरई राजगिरा पिकाचा समावेश बाबत माहिती दिली. पौष्टिक तृणधान्य पिकाच्या उत्पादन वाढीबरोबरच या पिकाचे आरोग्य विषयक फायद्याबाबत जनजागृती करून लोकांच्या आहारातील त्याचे प्रमाण वाढविणे हा आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरा करण्याच्या प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले .पौष्टिक तृणधान्ये नागली ज्वारी बाजरी वरई राजगिरा यांची माहिती पीपीटी द्वारे दाखवून शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी पौष्टिक तृणधान्य शपथ-मी शपथ घेतो की, आठवड्यातून किमान एकदा तरी पौष्टिक तृणधान्यायाच्या पदार्थांचे सहकुटुंब सेवन करीन ही शपथ सर्वांनी मिळून घेतली.श्री प्रवीण गवळी विद्यमान सभापती पंचायत समिती डहाणू यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पोष्टिक तृणधान्य यांचा आहारामध्ये समाविष्ट केलाच पाहिजे असे सांगितले. त्याचबरोबर बाहेरचे पदार्थ वडापाव चायनीज हे पदार्थ वारंवार एकाच तेलामध्ये बनवले जातात त्यामुळे ते शरीरासाठी हानिकारक आहेत. ते खाणे टाळले पाहिजे असे सांगितले. त्याचबरोबर भात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मत्स्य शेती, कुक्कुटपालन, शेळीपालन याचा अवलंब करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.श्री राहुल गायकवाड साहेब कृषी अधिकारी राज्यस्तरीय फळ रोपवाटिका दापचारी यांनी पौष्टिक तृणधान्य आणि आंबा मोहर पीक संरक्षण इत्यादी बाबत शेतकऱ्यांना सविस्तर सखोल मार्गदर्शन केले .श्री नामदेव वाडीले तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक डहाणू यांनी आत्मा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या बाबी, शेतकरी गट स्थापन करणे, इत्यादी बाबत आणि मोडगाव येथे अळंबी लागवड शेतीशाळा सुरू असल्याबाबत मान्यवरांना सांगण्यात आले. तालुका कृषि अधिकारी डहाणू,श्री अनिल नरगुलवार साहेब यांनी उपस्थित शेतकऱ्यांना MREGS फळबाग लागवड, शेततळे, मस्यबीज, तसेच इतर योजना बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर येत्या खरीप हंगामात तृणधान्ये पिके प्रात्यक्षिक म्हणून राबविण्यात येणार आहेत तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान केले. मा.श्री. काशीनाथ चौधरी साहेब, माजी बांधकाम सभापती , जिल्हा परिषद सदस्य पालघर यांनी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतला पाहिजे ,पौष्टिक तृणधान्ये यांचा दैनंदिन आहारामध्ये वापर केला पाहिजे याचे महत्त्वही सांगितले . त्याचबरोबर कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांचे विशेष आभार मानले.
कृषि पर्यवेक्षक कासा, श्री. हरिश्चंद्र वाघमारे. श्रीमती रंजना भरभरे कृषी सहाय्यक आंबोली, श्री डी रेडेकर कृषि सहाय्यक यांनी कार्यक्रम आयोजित करण्यास विशेष मेहनत घेतली. प्रगतशील शेतकरी श्री, विजय जाधव श्री. विलास चौधरी, शेतकरी आणि ग्राम संघाच्या महिला, असे एकूण ९७ शेतकरी उपस्थित होते. शेवटी उपस्थित शेतकऱ्याचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →