आज दि. 22/2/2023 बुधवार रोजी मंडळ कृषी अधिकारी,उंब्रज अधिनस्त मौजे हरपळवाडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत तृणधान्य विशेष फेब्रुवारी समर्पित महिना-ज्वारी पिक हुरडा पार्टी चे आयोजन

कृषी विभागामार्फत हरपळवाडी येथे हुरडा पार्टी चे आयोजन
👆आज दि. 22/2/2023 बुधवार रोजी मंडळ कृषी अधिकारी,उंब्रज अधिनस्त मौजे हरपळवाडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत तृणधान्य विशेष फेब्रुवारी समर्पित महिना-ज्वारी पिक हुरडा पार्टी चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील अनन्यसाधारण महत्त्व याविषयी श्री.रवी सुरवसे मं.कृ.अ.उंब्रज यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांनी खमंग हुरड्याचा,नाचणीच्या पापडांचा निस्रगाच्या सानिध्यात आस्वाद घेतला .तसेच उपस्थित शेतकऱ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
सदर कार्यक्रमास मा.श्री.रवी सुरवसे मं.कृ.अ.उंब्रज, ग्रा.प.सदस्य श्री.संतोष देशमुख,श्री.चंद्रकांत काळभोर,श्री.आंनदा संकपाळ,माजी सरपंच श्री.दिनकर काळभोर,श्री.शाम संकपाळ, चेअरमन श्री.प्रल्हाद काळभोर व इतर शेतकरी,श्री. पी.व्ही एटणे कृ.प.उंब्रज 2,श्री.एस.एम.जाधव कृ.प.उंब्रज 1,श्री.एस.एच.रणपिसे कृ.स. व श्री.एन.जे.सावंत कृषी सेवक पाल/चोरे उपस्थित होते. कार्यक्रमांची सांगता श्री.शाम संकपाळ यांनी आभार मानून झाली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →