दिनांक २१/०२/२०२३ रोजी मौजे दहागाव लाल बहादूर शास्त्री हायस्कूल .ता मंडणगड जि. रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरा करण्यात आले.तसेच या कार्यक्रमाची सुरवात पौष्टीक तरुणधान्य गीताने झाली. यामध्ये प्रामुख्याने नाचणी,राळा, वरई, ज्वारी, बाजरी,राजगिरा इ पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व फायदे याविषयी माहिती देण्यात आली तसेच कोकणातील भातानंतरचे प्रमुख पीक असलेल्या नाचणी पासून बनवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या पौष्टिक पदार्थ नाचणीचे लाडू, नाचणीचे सत्व,नाचणीचे पापड,बिस्कीट,नाचणी ची वडी, चकली,इडली इ नाचणीचे प्रक्रियायुक्त पदार्थांची माहिती देण्यात आली .व विविध योजनांची माहिती देणारी व पौष्टिक तृणधान्याची रांगोळी काढण्यात आली . सदर कार्यक्रमासाठी प्रशिक्षक म्हणून दिनेश पेडणेकर यांनी उपस्थित विद्यार्थी व शेतकरी यांना प्रशिक्षण दिले. सदर कार्यक्रमासाठी रुपाली मोरे उपसरपंच दहागांव शाळेतील मुख्याद्यापक हुलगे सर ,इंगळे सर कलमकर सर ,माने सर, नाटेकर मॅडम व शिपाई गौळ ,गुडेकर व कृषी विभागातील मा. तालुका कृषी अधिकारी एस. वी. घोडके मॅडम व कृषी सहाय्यक पी एम माळी ,एस जी कोठाळे ,एस ए यादव व जे एम पाटील क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते तसेच सदर कार्यक्रमास 250 -300 विद्यार्थी उपस्थीत होते .