आज दि. 15/2/2023 बुधवार रोजी मंडळ कृषी अधिकारी,उंब्रज अधिनस्त जि.प.प्राथमिक शाळा इंदोली येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये उपस्थीत विद्यार्थी व शिक्षक यांना तृणधान्य विशेष फेब्रुवारी समर्पित महिना-ज्वारी पिक अंतर्गत ज्वारी पिक व त्याचे आहारातील महत्त्व तसेच अन्य तृणधान्य यांविषयी श्रीमती टी. डी. थोरात कृषी सहायक इंदोली यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांना रोजच्या आहारात बाजरी/ज्वारी/नाचणी/राजगिरा इ.तृणधान्यांचा वापर करण्याविषयी आवाहन करण्यात आले. सदर कार्यक्रमास श्रीमती. जाधव मुख्याध्यापिका, श्रीमती. चव्हाण सहशिक्षिका, एकूण 40 विद्यार्थी, व श्रीमती टी. डी. थोरात कृषी सहायक इंदोली उपस्थित होते. कार्यक्रमांची सांगता श्रीमती चव्हाण मॅडम यांनी आभार मानून झाली.