आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मौजे सनपाने, मंडळ कुडाळ तालुका जावळी येथे पौष्टिक तृण धान्याचे आहारातील महत्व जनजागृती व हुरडा पार्टी कार्यक्रमाचे आयोजन

मौजे सनपाने कुडाळ मंडळ तालुका जावळी येथे आंतरराषट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत पौष्टिक तृण धान्याचे आहारातील महत्व जनजागृती कार्यक्रम, श्री. रमेश देशमुख तालुका कृषि अधिकारी,श्री. ज्ञानदेव जाधव मंडल कृषी अधिकारी कुडाळ,यांच्या मार्गदर्शनाखाली ज्वारी पीक प्रात्याशिक भेट व हुरडा पार्टी आयोजित केली होती.श्री.देशमुख सो तालुका कृषि अधिकारी जावळी यांनी ज्वारीचा हुरडा व त्याचे आहारातील महत्त्व माहिती दिली. पौष्टिक तृणधान्यापासून मिक्स आटा तयार करून यामध्ये गहू, ज्वारी,मका, नाचणी ओट यांचा एकत्रितपणे आहारात समावेश केल्यास शरीरातील बरेचशा व्याधी नियंत्रणात राहण्यास मदत होईल तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वरील प्रमाणे मिक्स आटा करून त्यापासून चपातीचा आहारात उपयोग करावा. श्री ज्ञानदेव जाधव मंडळ कृषी अधिकारी कुडाळ यांनी महिला बचत गटांच्या माध्यमातून पौष्टिक तृणधान्यांचे प्रक्रिया युक्त पदार्थ तयार पौष्टिक तृणधान्यांचे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून मूल्यवर्धन करण्या करिता प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेचा लाभ घेऊन प्रक्रिया युक्त मूल्यवर्धित पदार्थ तयार करून महिला बचत गटांनी आर्थिक उन्नती करावी.दिनांक 20 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये कनेरी मठ कोल्हापूर येथे पंचमहाभूते महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.या महोत्सवामध्ये आकाश, अग्नी, पृथ्वी, जल, वायु या पंचमहाभूतांचे दालन स्वरूपात विस्तृत प्रदर्शन आयोजित केलेले आहे सदर महोत्सव मध्ये 1500 हून अधिक स्टॉल तसेच 650 जिवंत प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आलेले आहेत. सदर महोत्सवाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे कृषी विभागामार्फत आव्हान करण्यात आले. सदर कार्यक्रमास श्री. दशरथ डोंबाळे कृषीपर्यवेक्षक कुडाळ, धनजय सापते,सुरेश रावते, सुजित कदम कृषी सहायक ,श्री, मोहन कोंडीबा दूर्गवळे सरपंच, श्रीमती नवले ग्रामसेविका संदीप पवार शंकर पवार, भीमराव पोफळे, लक्ष्मण पवार शेतकरी उपस्थित होते.श्री. सुजित कदम कृषी सहायक यांनी सरते शेवटी सर्वांचे आभार मानलें.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →