आज दिनांक २१/०२/२०२३ रोजी मौजे -रानगेघर ,तालुका -जावळी जिल्हा सातारा येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्ये वर्ष 2023 व महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत हुरडा पार्टी कार्यक्रमाचे आयोजन

मौजे रानगेघर, कुडाळ मंडळ ता.जावळी जिल्हा सातारा येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्ये वर्ष 2023 अंतर्गत श्री रमेश देशमुख तालुका कृषी अधिकारी जावळी व श्री ज्ञानदेव जाधव मंडळ कृषी अधिकारी कुडाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हुरडा पार्टी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .सदर कार्यक्रमासाठी गावचे सरपंच श्री आदिनाथ मोरे ,भानुदास चोरगे कृषी सहाय्यक, एस .के. रावते कृषी सहाय्यक प्रगतशील शेतकरी श्री.ज्ञानेश्वर करंदकर , विठ्ठल करंदकर,श्रीमंत भोसले ,सुभाष भोसले ,आबाजी भोसले, नथू करंदकर व शेतकरी उपस्थित होते. सदर कार्यक्रमांमध्ये श्री भानुदास चोरगे कृषी सहाय्यक सोनगाव यांनी ज्वारीचे आहारातील महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांचे व मान्यवर यांचे आभार श्री.एस.के.रावते कृषी सहाय्यक यांनी मानले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →